समाजातील दुर्लक्षित घटकांना प्रवाहात आणण्यासाठी आमचा अविरत प्रयत्न.
आमच्याबद्दल अधिक मदत करा
निवासी स्वरूपात ४० विद्यार्थ्यांचे यशस्वी शिक्षण आणि संगोपन.
संपर्क करा
"जोशाबा फौंडेशन" हि एक सेवाभावी संस्था असून मा. श्री. राजेश घोडके यांच्या स्वयंप्रेरणेतून या संस्थेचा जन्म झाला. जन्म घेणारा माणूस हा सर्वांगाने सदृढ असेल असे नाही. काही वेळा काही विचित्र समस्या निर्माण होऊन नकळत्या वयात मतिमंदत्व पदरात पडलेली मुले, त्यांचा काही दोष नसताना देखील समाजात उपेक्षित राहिलेली दिसतात. हे वास्तव सुजाण मानवाला नक्की बोचणारे आहे.
आजमितीला बदलत्या जीवनशैलीमुळे मतिमंदांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. हे वास्तव जाणून काहीतरी करण्याची इच्छा मनी बाळगून श्री. राजेश घोडके यांनी २००३ सालापासून प्रयत्न सुरु केले. समाजातील विविध स्तरातील घटकांना जोडत, अथक प्रयत्नांनी त्यांनी "जोशाबा फौंडेशन" हि संस्था २००५ साली सुरु केली.
या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. परंतु त्यांचे खरे ध्येय हे "मतिमंदांचे पुनर्वसन" या बिंदू भोवती केंद्रित राहिले. २०११ साली त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि पंढरपुरात पहिली कायम विनाअनुदानित मतिमंद शाळा वाखरी येथे सुरु झाली. आज या मतिमंद शाळेत ४० निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आपल्या अंधारलेल्या आयुष्याला उजळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
स्थापना: २००५
विद्यार्थी संख्या: ४०+
पहिली विनाअनुदानित शाळा
निवासी व्यवस्था